सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अभिज्ञा भावेने मेहुल पैशी लग्न केले. आता त्यांच्या पाठोपाठ ‘गंध फुलांचा गेला सांगून’ मालिकेत काम करणारा अभिनेता आशुतोष कुलकर्णी लग्नबंधनात अडकला आहे.
नुकताच आशुतोष कुलकर्णीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्याने ८ जानेवारी २०२१ रोजी अभिनेत्री रुचिका पाटीलशी लग्न केले. या लग्नसोहळ्याला अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. सध्या आशुतोषच्या लग्नामधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेत आहेत. अनेकांनी फोटोवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
रेशीमगाठ! अभिज्ञा-मेहुलच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल
आशुतोषने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘साथ दे तू मला’, ‘असंभव’, ‘माझी लाडकी’ या मालिकामधील त्याच्या भूमिका गाजल्या होत्या. त्याने चित्रपटांमध्येही काम केले आहे. आशुतोषची पत्नी रुचिका हिने ‘असे हे कन्यादान’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकांमध्ये काम केले आहे.