बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका कनिका कपूरने शुक्रवारी तिला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. ‘बेबी डॉल’ फेम गायिका ही भारतातील पहिली करोनाचा संसर्ग झालेली सेलिब्रिटी आहे. पण कनिकाने ही गोष्ट सर्वांपासून लपवली. कनिका लंडनहून परत येताच तिने एका पार्टिला हजेरी लावली होती. दुष्यंत सिंग, वसुंधराराजेंसह बडे नेते-अधिकारी पार्टीत होते. ती जवळपास ३५० ते ४०० लोकांच्या संपर्कात आली होती. आता या सर्वांनी स्वत:चे विलगीकरण करुन घेतले आहे.
या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह हे देखील उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत यांनी संसदेत हजेरी लावली. कनिकाची करोना चाचणी पॉझिटीव्ह झाल्याचे कळताच शुक्रवारी वसुंधरा राजे आणि दुष्यंत यांनी स्वत:चे विलगीकरण करुन घेतले आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
While in Lucknow, I attended a dinner with my son Dushyant & his in-laws. Kanika, who has unfortunately tested positive for #Covid19 was also a guest.
As a matter of abundant caution, my son & I have immediately self-quarantined and we’re taking all necessary precautions.
— Vasundhara Raje (@VasundharaBJP) March 20, 2020
काँग्रेस नेते जतिन प्रसाद आणि उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रकाश सिंह हे देखील पार्टिला उपस्थित होते. त्यांनी सुद्धा स्वत:चे विलगीकरण केल्याचे एएनआयने म्हटले आहे. तृणमूल काँग्रसचे आमदार डेरेक ओ ब्रायन हे दोन तास दुष्यंत यांच्यासोबत असल्यामुळे त्यांनी १८ मार्च रोजी स्वत:चे विलगीकरण करुन घेतले आहे.
5.30 pm.
Friday, March 20.
Home.
New Delhi.
My statement on video.Am on self-isolation and following all protocol, as I was sitting right next to MP Dushyant for two hours at a #Parliament meeting on March 18. #COVID19 pic.twitter.com/vX01w9o1D8
— Citizen Derek | নাগরিক ডেরেক (@derekobrienmp) March 20, 2020
अपना दल पक्षाच्या आमदार अनुप्रिया पटेल आणि भाजपाचे आमदार वरुण गांधी हे देखील दुष्यंत यांच्या संपर्कात आले होते. म्हणून त्यांनी देखील स्वत:चे विलगीकरण करुन घेतले आहे.
कल एक कार्यक्रम में मैं मौजूद थी। उस कार्यक्रम में सहयोगी सांसद श्री दुष्यंत सिंह भी मौजूद थे। सावधानी के तौर पर मैं सेल्फ़ आइसोलेसन में जा रही हूँ। सरकार द्वारा आवश्यक दिशा निर्देशो का पालन करूँगी ।
— Anupriya Patel (@AnupriyaSPatel) March 20, 2020
कनिका दहा दिवसांपूर्वी लंडनहून भारतात परतली आहे. पण तिला करोनाची लक्षणे चार दिवसांपूर्वी दिसू लागल्याचे तिने म्हटले आहे. ‘सध्याच्या परिस्थित तुम्ही सर्वांनी स्वत:चे विलगीकरण करण्याचा सराव करा आणि तुम्हाला काही लक्षणे जाणवली तर तातडीने चाचणी करुन घ्या’ असे कनिकाने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.