‘पद्मावत’ चित्रपटात रणवीरने साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले यात शंका नाही. केवळ चाहत्यांनीच नाही तर चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनीही त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली. अमिताभ बच्चन यांनी तर स्वतःच्या हस्ताक्षरात त्याच्यासाठी पत्र लिहिले. केवळ बिग बीच नाही तर परफेक्शनिस्ट आमिर खानचे लक्ष वेधण्यातही रणवीरला यश आल्याचे दिसते. ‘मिड डे’मध्ये आलेल्या वृत्तानुसार रणवीर लवकरच आमिरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर एली म्हणते..

रणवीर आणि आमिर हे एकत्र दिसणार हे सत्य असले तरी ते चित्रपटात एकत्र काम करणार नसून, ते एका जाहिरातीत एकत्र झळकतील. एका मोबाईल ब्रॅण्डने या दोघांनाही आपल्या मजेशीर आणि फिल्मी कल्पना ऐकवल्या. त्यावर दोघांनीही लगेच जाहिरातीसाठी होकार दिला. या दोघांनीही तात्काळ होकार दिला असला तरी जाहिरातीचे काम मात्र दोन महिन्यांनंतरच सुरु होऊ शकते. कारण, सध्या हे दोघेही व्यावसायिक कारणांमुळे बांधिल आहेत. रणवीर आता झोया अख्तर दिग्दर्शित ‘गल्ली बॉय’चे तर आमिर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे चित्रीकरण करण्यात व्यस्त आहे. चित्रीकरणाच्या कामात दोघांचाही बराचसा वेळ जात असल्यामुळे मोबाईल कंपनीला त्यांच्यासाठी थांबणे भाग आहे.

वाचा : जाणून घ्या नजरेने घायाळ करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल

दरम्यान, रणवीरचा ‘पद्मावत’ आणि आमिरचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ पाश्चिमात्य देशात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या या प्रसिद्धीचा मोबाइल कंपनीलाही बराच फायदा होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After padmaavat and gully boy ranveer singh to work with aamir khan