बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री म्हणून नोरा फतेहीकडे पाहिले जाते. नोराने तिच्या डान्सने अनेकांची मने जिंकली आहेत. नुकताच नोराच्या ‘छोड देगें’ या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला. या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दरम्यान नोराचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नोरा डान्स करत असते आणि तिचा सेक्सी डान्स पाहून तिची आई चप्पल फेकून मारते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नोराने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये नोरा डान्स करत आहे. त्यावेळी तिची आई तिला स्वयंपाक घरातून डान्स करताना पाहत असते. नोराचा सेक्सी डान्स पाहून तिची आई तिच्या अंगावर चप्पल फेकून मारते. दरम्यान तिची आई म्हणते, ‘करोना विषाणूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे आणि तुला वॅप चॅलेंज सुचतय. बंद कर ते पहिले.’
सध्या सोशल मीडियावर नोराचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला असून चर्चेत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. नरगीस फाकरी आणि एली अवराम यांनी नोराच्या या व्हिडीओचे कौतुक केले आहे.
Video: जया बच्चन रॉक्स! ‘पल्लो लटके’ गाण्यावर श्वेता बच्चनसोबत केला डान्स
नुकताच नोराचे ‘छोड देंगे’ या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमधील नोराचा लूक पाहाता चाहत्यांमध्ये गाणाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी तिचा गुरु रंधावासोबत एक नवा अल्ब लाँच झाला होता. या अल्बमचे नाव ‘नाच मेरी रानी’ असे आहे. नोरा ही ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमुळे प्रकाश झोतात आली. ‘दिलबर दिलबर’ गाण्यापूर्वी नोरा ‘ओ साकी साकी’ गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हे गाणे जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाउस’ चित्रपटामधील आहे. ‘ओ साकी साकी’ या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमध्ये नोराच्या दिलखेचक अदा चाहत्यांच्या मनावर राज्य करत होत्या.