प्रसिद्ध अभिनेत्री एलन पेज हिने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन पुरुष लिंग स्विकारले आहे. गेल्या वर्षी सोशल मीडिया पोस्टद्वारे एलनने चाहत्यांना या संदर्भात माहिती दिली होती. त्यावेळी एलनने घेतेल्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. तिने तिचे नाव बदलून एलियॉट असे देखील केले आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता पहिल्यांदाच एलियॉटने स्वत:चा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे.
एलियॉटने पहिल्यांदाच इन्स्टाग्राम अकाऊंटवर शस्त्रक्रिया केल्यानंतर शर्टलेस फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच स्विमिंग सूटमधील फोटो’ या आशयाचे कॅप्शन देण्यात आले आहे. एलियॉटने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्याचे कौतुक केले तर काहींनी टीका केली आहे.
आणखी वाचा : ‘हा मूर्ख माणूस…’, हंसल मेहताचा रामदेव बाबांवर निशाणा
आणखी वाचा : कमल हासन-सारिकाचा १६ वर्षांचा संसार तुटल्यानंतर श्रुती हासनला झाला होता आनंद
एलन पेज ही हॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. आजवर ‘एक्स मेन’, ‘इन टू द फॉरेस्ट’, ‘इन्सेप्शन’, ‘जुनो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अष्टपैलू अभिनय शैलीमुळे तिने हॉलिवूड चित्रपटसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
एलन गेल्या तीन-चार वर्षे एमा पोर्टनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तिने प्रेयसीसोबत लग्न करणार असल्याचे म्हटले होते. प्रेयसीच्या प्रेमाखातर मी लिंग देखील बदलू शकते असे तिने एका मुलाखतीत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर तिने ही शस्त्रक्रिया एमासाठीच केली अशी चर्चा आहे. आता एलियॉटने शेअर केलेला फोटो सध्या चर्चेत आहे.