बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा आई होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गोव्यामधील एका बीचवरचा तिचा एक फोटो व्हायरल होत असून यात ती प्रेग्नंट असल्याचं दिसून येत आहे. मात्र ऐश्वर्या प्रेग्नंट नसून चुकीच्या अॅग्लने फोटो काढल्यामुळे हा गैरसमज निर्माण झाल्याचं ऐश्वर्याच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

सध्या ऐश्वर्या राय-बच्चनचा गोव्याच्या बीचवर पती अभिषेक बच्चनसोबत समुद्र किनाऱ्यावर फिरत असतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत ऐश्वर्याचं पोट किंचितसं पुढे आल्यामुळे ते बेबी बंपप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे ऐश्वर्या पुन्हा एकदा आई होणार अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे तिचा हा फोटो सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. मात्र ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होणार नाही असं तिच्या प्रवक्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.


ऐश्वर्या राय -बच्चन यांच्या प्रेग्नंसीविषयी सध्या सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चा निव्वळ अफवा आहेत. त्या पुन्हा आई होणार नसून ज्या छायाचित्रकाराने हा फोटो काढला त्याचा अॅगल किंवा फोटो काढण्याची पद्धत चुकली असावी त्यामुळेच ऐश्वर्या गरोदर असल्याचा चाहत्यांचा समज झाला आहे. मात्र प्रत्यक्षात असं काही नाहीये ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होणार नाही, असं ऐश्वर्याच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

२००० साली ‘ढाई अक्षय प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचं सूत जुळलं होतं. त्यानंतर २००७ साली या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर २०११ मध्ये ऐश्वर्याने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. ऐश्वर्या- अभिषेकला कन्यरत्न झालं असून तिचं नाव आराध्या असं आहे. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने काही काळ बॉलिवूडला रामराम ठोकला होता. मात्र आता ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली असून लवकरच तिचा ‘गुलाबजामुन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.