– आर्य अजिंक्य देव याच्या लघुपटाची लिफा महोत्सवात निवड
– आर्य देव याला यावेळेस आयोजिलेल्या रेड कार्पेटसाठीही खास आमंत्रण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश देव यांचा नातू व अजिंक्य देव याचा मुलगा आर्य याने दिग्दर्शित केलेल्या मेटानोया METANOIA या लघुपटाची लिफा महोत्सवात निवड झाली असून आर्य याला त्यासाठी खास लंडन येथे आमंत्रित करण्यात आले आहे.लिफा म्हणजे लंडन इंडिपेंडन्ट फिल्म अवॉर्ड London Independent Film Award हा खूप प्रतिष्ठेचा असा चित्रपट महोत्सव आहे. २९ जुलै रोजी लंडनच्या रॉक्सी बार अॅण्ड स्क्रीन Roxy Bar and Screen येथे या पंधरा मिनिंटाच्या लघुपटाचे आयोजन करण्यात आले आहे. हा लघुपट सायकॉलॉजिकल मिसऑर्डर याभोवती आहे.

Father’s Day 2017 : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘कूल बाबा’

विशेष म्हणजे आर्य देव याने कोणत्याही प्रकारचे चित्रपट दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतलेले नाही. आपला काका अभिनय देव याच्याकडे ‘२४’ या मालिकेच्या दुसऱ्या भागासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काही काळ काम केले आहे इतकेच. आर्य खूपच मेहनती आणि फोकस आहे अशा शब्दांत अजिंक्य देव याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आर्यने त्याच्या वडिलांना म्हणजेच अजिंक्य देवला एक प्रकारे ही फादर्स डेची भेटच दिली आहे असे म्हणता येईल. दरम्यान, याच लघुपटाच्या कामानिमित्त आर्य सध्या युरोपला गेला आहे. त्यामुळे त्याच्याशी याविषयी संवाद साधता आलेला नाही.

अजिंक्य देव आणि आरती यांना दोन मुलं आहेत. तान्या आणि आर्य अशी त्यांच्या मुलांची नाव आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajinkya deos son aaryas short film selected in london independent film award