चित्रपटांमधील काम आणि आपले कुटुंब यामध्ये योग्य तो समतोल राखण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारचे नाव न चुकता घेतले जाते. आपल्या चित्रपटांमध्ये सामाजिक भान जपणारा ‘खिलाडी’ कुमार त्याच्या पत्नीला आणि मुलांनाही पुरेपूर वेळ देतो. आज ट्विंकल आणि अक्षयचा मोठा मुलगा आरवचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपल्या लाडक्या राजकुमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अक्कीने मुलाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : आराध्यासाठी ‘पझेसिव्ह’ असलेल्या अभिषेकने केले हे काम…

आरव आज १५ वर्षांचा झाला. आपल्या हॅण्डसम लेकाचा फोटो शेअर करत अक्षयने त्याला सुंदर कॅप्शनही दिली. ‘झाडावर कसे चढायचे हे मी तुला शिकवले पण नंतर व्हिडिओ कॉल कसा करायचा हे मी तुझ्याकडून शिकलो…. माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…’

वाचा : युवराज सिंगच्या पत्नीबद्दल पसरतेय ‘ही’ अफवा

आरवचा हा फोटो पाहता भविष्यात तोही मॉडेल आणि अभिनेता होईल, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. दरम्यान, नेहमीच काहीतरी हटके ट्विट करणाऱ्या ट्विंकलने अद्याप आपल्या मुलाला सोशल मीडियावर शुभेच्छा दिलेल्या नाहीत. ‘मिसेस फनी बोन्स’ म्हणून प्रसिद्ध असलेली ट्विंकल आरवला कशाप्रकारे शुभेच्छा देते हे नक्कीच पाहण्याजोगे असेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar shared handsome son aarav on his birthday