ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुफान गाजलेली वेब सीरिज म्हणजे मिर्झापूर’. कमी कालावधीत या सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली. गुड्डू भैय्या, कालीन भैय्या यांनी तर अक्षरश: प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळेच अली फजल,पंकज त्रिपाठी यांच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे ‘मिर्झापूर’ आणि ‘मिर्झापूर 2’ च्या यशानंतर अभिनेता अली फजलच्या मानधनात वाढ झाली आहे.
उत्तम अभिनयामुळे अलीला मिळत असलेली लोकप्रियता पाहून त्याने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. मानधनातील ही वाढ साधीसुधी नसून त्याने ३० ते ४० टक्के मानधन वाढवल्याचं सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा- मिर्झापूरमधील गुड्डू पंडित करायचा कॉल सेंटरमध्ये काम; मिळत होता इतका पगार
अलीने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येदेखील काम केलं आहे. त्यामुळेच आता त्याने त्याचं मानधन वाढवलं आहे. लवकरच त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात केनेथ ब्रेनागच्या ‘डेथ ऑन द नाईल’ या हॉलिवूडपटात तो झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आर्मी हॅमर, केनेथ ब्रेनाग ही कलाकारमंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत. तर, ‘फुकरे 3’ या चित्रपटातही अली झळकणार आहे.