बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता पाच महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान सुशांतच्या मृत्यूमुळे अभिनेता अमित साधला जबरदस्त धक्का बसला. नुकताच तो कूल्लू येथून मुंबईत परतला. त्यावेळी त्याच्या विमानाच्या तिकिटीवर SSR असं लिहिलं होतं. खरं तर तो त्याचा आसन क्रमांक होता. पण SSR ही तीन अक्षर पाहून तो भावूक झाला. कारण सुशांतला देखील SSR या नावानेच हाक मारायचा.
अवश्य पाहा – ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहायचा का?’; ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला
आमित आणि सुशांत या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. त्यांनी ‘काय पो छे’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर कामात व्यस्त असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. अन् एक दिवस सुशांतच्या मृत्यूची बातमी त्याला समजली. सुशांतच्या मृत्यूमुळे त्याला जबरदस्त धक्का बसला. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने तो विमानाच्या तिकिटाचा उल्लेख केला. तो म्हणाला, “मी कूल्लू येथून मुंबईत येत होतो. त्यावेळी माझ्याकडे जे विमानाचं तिकिट होतं त्यावर SSR असं लिहिलं होतं. ती तीन अक्षर पाहून मी खूप भावूक झालो. खरं तर केवळ माझ्याच तिकिटावर ती तीन अक्षर होती. यावरुन मला कळलं की सुशात भौतिकदृष्ट्या माझ्यासोबत नाही पण तो माझ्या मनात कायम राहिल.”
अवश्य पाहा – साडीमध्ये खुललं अमृताचं सौंदर्य; पाहा अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर सुशांत प्रकरणाची चौकशी आता बंद होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु ही शक्यता सीबीआयने फेटाळून लावली आहे. सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत प्रकरणाची चौकशी सुरुच राहील.