बॉलिवूडचा शहेनशहा म्हणजेच अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. ट्विट किंवा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ते कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओ किंवा त्यांचे विचार शेअर करताना दिसतात. यावेळी मात्र, त्यांनी त्यांच्या लेकासोबत म्हणजेच अभिषेक बच्चनसोबत एक फोटो शेअर केला आहे.
बिग बींनी शेअर केलेला फोटो सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि लहानपणीचा अभिषेक दिसून येत आहे. बिग बींनी दोन फोटो कोलाज केले आहेत.
यातील एक फोटो सध्याच्या काळातला असून दुसरा फोटो अभिषेक लहान असतानाचा आहे. या दोन्ही फोटोच्या माध्यमातून त्यांनी काळ कसा पटकन पुढे सरकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, बिग बी अनेकदा त्यांच्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतात. यापूर्वीदेखील त्यांनी अभिषेक आणि श्वेतासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. सध्या बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचं सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे लवकरच ते ‘ब्रह्मास्त्र’,’ चेहरे’ आणि ‘झुंड’ या चित्रपटात झळकणार आहेत.