बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात हे साऱ्यांनाच ठावूक आहे. सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी काही कविता, पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्येच त्यांनी आता एक जुना फोटो शेअर केला असून चाहत्यांना एक भन्नाट चॅलेंज दिलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांनी कोलकातामधील इडन गार्डन स्टेडिअममधूल असून एका सामन्याच्या दरम्यान काढला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकार असून या कलाकारांना ओळखून दाखवा असं बिग बींनी म्हटलं आहे. त्यामुळे या कलाकारांना ओळखण्याचं चॅलेंज त्यांनी चाहत्यांना दिलं आहे.

“दररोज सध्याच्याच परिस्थितीविषयी चर्चा होतात. मात्र काही निरंतर विचारांमुळे जुन्या आठवणींमध्ये रमायला होतं”, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोबतच त्यांनी,” तुम्ही किती कलाकरांची नाव ओळखू शकलात?” असा प्रश्नही विचारला आहे. परंतु या ट्विटच्या शेवटी त्यांनी कलाकारांची नावं सांगितली आहे.

दरम्यान, बिग बींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत अभिनेता जितेंद्र, दिलीपकुमार, अनिल चोप्रा, जॉनी वॉकर, अनिल चटर्जी,रवी घोष आणि प्रेमा चोप्रा ही कलाकार मंडळी आहेत. हा फोटो १९७९ साली काढण्यात आला आहे.