काही दिवसांपूर्वी टॉपलेस फोटोशूट केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन आई झाली आहे. अ‍ॅमीने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली. विशेष म्हणजे तिने या फोटोला जे कॅप्शन दिलं आहे ते साऱ्याचं लक्ष वेधून घेत आहे.

‘या जगामध्ये तुझं स्वागत आहे..आंद्रेस..’ असं म्हणत अ‍ॅमीने तिच्या बाळाचं स्वागत केलं. सोबतच त्याचं नावही जाहीर केलं. शेअर करण्यात आलेला हा फोटो रुग्णालयातील असून तिच्या चेहऱ्यावर आई झाल्याचा आनंद पूर्णपणे झळकत आहे.