अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री अंकिता लोखंडेचा उल्लेख केला. अंकिता ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सुशांतच्या संपर्कात असल्याचं रियाने मुलाखतीत म्हटलं. त्यावर अंकिताने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे. या पोस्टमध्ये अंकिताने रियाचे सर्व दावे फेटाळले आहेत.
२०१३ मध्ये सुशांत पहिल्यांदा नैराश्याला सामोरं गेला होता, असं रियाने मुलाखतीत सांगितलं होतं. त्यावरही अंकिताने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सुरुवातीपासून ते २३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत मी आणि सुशांत एकत्र होतो. त्यादरम्यान त्याला कधीच नैराश्याचा त्रास नव्हता आणि तो मानसोपचारतज्ज्ञांनाही भेटला नव्हता. तो एकदम ठीक होता’, असं अंकिताने स्पष्ट केलं.
सुशांतसोबत संपर्कात असल्याच्या रियाच्या दाव्यावर अंकिताने पुढे लिहिलं, ‘आमच्या ब्रेकअपनंतर मी सुशांतच्या संपर्कात होते असं मी कधीच कुठे म्हटलं नाही. मणिकर्णिकाच्या शूटिंगदरम्यान सुशांतने एका इन्स्टा पोस्टवर माझ्यासाठी कमेंट केली होती. माझ्या प्रोजेक्टसाठी त्याने शुभेच्छा दिल्या होत्या आणि मीसुद्धा त्याला केवळ धन्यवाद म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही फोनवर बोललो हा रियाचा दावा मी फेटाळते.’ अंकिताने रियाला ओळखत नाही आणि सुशांतसोबत तिच्या रिलेशनशिपलाही ओळखत नाही असंही तिने स्पष्ट केलं.
आणखी वाचा- ‘आमची पहिली भेट..’; रियाने सांगितली सुशांतसोबतची लव्हस्टोरी
या पोस्टच्या अखेरीस अंकिताने सुशांतच्या कुटुंबीयांची साथ देणार असल्याचं म्हटलं. ‘मी सुशांतच्या कुटुंबीयांच्या पाठीशी कायम उभी राहणार. त्यांच्याकडे रियाविरोधात काही चॅट्स आणि पुरावे आहेत जे नाकारू शकत नाही. मी शेवटपर्यंत त्यांची साथ देईन’, असं तिने अखेरीस लिहिलं.