टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. दिवाळीनिमित्त अंकिताने तिच्या मित्र-मैत्रिणी व बॉयफ्रेंड विकी जैनसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत अंकिता तिच्या बॉयफ्रेंडला ओरडताना दिसतेय.
अंकिता व विकीचा हा व्हिडीओ व्हूम्पला या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती विकी जैन आणि इतर मित्र-मैत्रिणींसोबत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. दिवाळी पार्टीत हसत-खेळत, मस्करी करत अंकिता शुभेच्छा देत असताना विकी जैन मागून एका शब्दाचा उच्चार करतो. त्यानंतर अंकिता त्याच्यावर ओरडते आणि त्याला सांगते की, “सोशल मीडियावर असं बोलायचं नसतं.” थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा अंकिता व विकी मिळून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.
पाहा फोटो : बॉयफ्रेंड विकी जैनसोबत अंकिता लोखंडेची खास दिवाळी
अंकिताने दिवाळी सेलिब्रेशनचे अनेक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने विकी जैनसोबत काही रोमॅण्टिक फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता आता बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करतेय. अंकिताने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘बागी ३’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.