अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्यातच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड बऱ्याच वेळा चौकशीमध्ये समोर येणाऱ्या घटनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत आहे. नुकतीच या प्रकरणी सुशांतशी कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीची चौकशी झाली. त्यानंतर अंकिताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अंकिताने इन्स्टाग्रामवर सुशांतच्या आईचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनमुळे तिला सुशांतची आठवण येत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही हा फोटो पाहिल्यावर त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळल्याचं दिसून आलं.
“तुम्ही दोघं एकमेकांच्या सोबत असाल अशी आशा करते”, असं कॅप्शन अंकिताने या फोटोला दिला आहे. सुशांतचं त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होतं. आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी त्याने आईचा एक फोटो शेअर केला होता. यावरुन त्यांचं आईवर किती प्रेम होतं याचा अंदाज चाहत्यांना आला होता. त्यामुळेच आता मृत्यूनंतर सुशांत त्याच्या आईसोबत असेल अशी आशा अंकिताने व्यक्त केली आहे. सुशांतच्या आईचं २००२ मध्ये निधन झालं होतं.