‘लव सेक्स और धोखा’ आणि ‘नो फादर्स इन कश्मीर’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता अंशुमन झाने गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जवळपास ३० तास पीपीई किट घालून प्रवास केला. आता त्याने साखरपूडा केल्याचे देखील समोर आले आहे.

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अंशुमन गेले चार महिने घरात होता. या चार महिन्यात तो जेवण कसे बनवायचे हे शिकला. जानेवारी महिन्यात त्याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो घरात एकटाच होता. सतत वाटणाऱ्या एकटेपणामुळे अशुंमनने गर्लफ्रेंडला अमेरिकेला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने ३० तास प्रवास केला.

हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अशुंमन वंदे मातरम फ्लाइने अमेरिकाला केला. त्याने ३० तास पीपीई किट घालून प्रवास केला. दरम्यान त्याने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाचा वापर केला नाही. तसेच प्रवासात त्याने केवळ ड्राय फूट्स खाले. अमेरिकेत पोहोचल्यावर त्याने दोन आठवडे स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले होते. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडसोबत साखरपूडा केला आहे.

अंशुमनच्या गर्लफ्रेंडचे नाव Sierra आहे. त्यांची पहिली ओळख हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे झाली होती. तेथे अंशुमन त्याच्या आईच्या कर्करोगावर उपचार घेत होता. तेथे त्यांची पहिली ओळख झाली. अंशुमनने इन्स्टाग्रामावर गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत साखरपूडा झाल्याचे सांगितले आहे.