‘ओ माय गॉड’चा दिग्दर्शक उमेश शुक्ला आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शक गिरीश जोशीच्या आगामी कॉमिक थ्रिलरमध्ये अभिनेता अर्शद वारसी दिसणार आहे. उमेश शुक्ला या चित्रपटाच्या निर्मितीसह मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरिश जोशीबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. ‘ओ माय गॉड’ चित्रपटाची कथा लिहिणारा भवेश मंडलिया या चित्रपटाची कथा लिहीत आहे.
उमेश म्हणाला, मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक असून, भवेश मंडलियाबरोबर माझा चांगला समन्वय राहिला आहे. आम्ही अर्शद वारसीबरोबर काम करणार असून, तो एक प्रतिभावान कलाकार आहे.
या चित्रपटासाठी अर्शद वारसीबरोबर परेश रावलशीही संपर्क केला जात असल्याचे त्याने सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-07-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arshad warsi in omg directors next