आमिर खानच्या ‘जो जीता वो सिकंदर’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आयशा जुल्का ही ९० दशकात एक सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. आमिर खान, अक्षय कुमार, सलमान खान यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्यांसोबत झळकलेल्या या अभिनेत्रीकडे त्यावेळी चित्रपटांची अक्षरश: रांग लागली होती. परंतु ‘प्रेम कैदी’ या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेत एकाएकी घट झाली. या चित्रपटात तिला बिकिनी परिधान करण्यास सांगितली होती, परंतु यासाठी तिनं नकार दिला. त्यानंतर तिच्या करिअरला उतरती कळा लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या करिअरमधील हा अवाक् करणारा प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “प्रेम कैदी हा खूपच सुंदर चित्रपट होता. पटकथा वाचताच मी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. परंतु निर्मात्यांनी बिकिनी परिधान करण्याची अट माझ्यासमोर ठेवली होती. आज जितक्या सर्रासपणे अभिनेत्री चित्रपटांमध्ये बिकिनी परिधान करतात तसं धाडस करण्याची इच्छा माझी नव्हती. त्यामुळे मी निर्मात्यांना नकार दिला. अखेर निर्मात्यांनी मला चित्रपटातून बाहेर केलं. या चित्रपटानंतर अनेक मोठे प्रोजेक्ट माझ्या हातून गेले. त्यावेळी मी कामात प्रचंड गुंतले होते त्यामुळे मिळणाऱ्या रिजेक्शनला मी फारस महत्व दिलं नाही. पण आज करिअरच्या उत्तरार्धात जेव्हा ते चित्रपट पाहाते तेव्हा थोडं दु:ख तर नक्कीच होतं.” असा अनुभव तिनं सांगितला.

आणखी वाचा- मी जिंकणारंच! अभिनेत्रीनं लावली कारसोबत शर्यत; पाहा हा थक्क करणारा व्हिडीओ

प्रेम कैदी हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करिश्मा कपूर हिने मुख्य भूमिका साकारली होती. जबरदस्त गाणी आणि पटकथा यांच्या जोरावर हा चित्रपट सुरहिट ठरला होता. या चित्रपटामुळेच करिश्माच्या करिअरचा खऱ्या अर्थाने गती मिळाली असं म्हटलं जातं. या चित्रपटाला नकार दिल्यानंतर आयशानं खिलाडी, वक्त हमारा है, हिंमतवाला, चाची ४२० यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु या चित्रपटांमध्ये तिला प्रामुख्याने सहाय्यक भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayesha jhulka i had rejected prem qaidi due to bikini mppg