तरुणाईच्या टेक्नोसेव्हीपणामुळे नात्यांचे ‘रेशमी’ बंध आता मानवनिर्मित ‘नायलॉन’चे धागे झाल्याचे एका हृद्यस्पर्शी कथानकातून ‘बंध नायलॉन’चे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. स्वत:ची स्वप्ने साकार करण्यासाठी नात्यांना झिडकारणारा एक तरुण.. त्याची स्वप्नपूर्ती झाल्यानंतरही मुलीच्या समाधानासाठी खोटी नाती उभारून मिळवू इच्छिणारे सुख आणि त्यातून खऱया नात्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देणारे काही प्रसंग, अशी थेट भावनेला भिडणारी कथा ‘बंध नायलॉन’ची असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी लिहिलेल्या ‘बंध नायलॉनचे’ या एकांकिकेवरील हा चित्रपट आहे. चित्रपटातील भूमिकांमध्ये सुबोध भावे हा केंद्रस्थानी असून, महेश मांजेरकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, सुबोध भावे, संजय नार्वेकर, श्रुती मराठे, प्रांजळ परब यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कोकण, सासवड यासारख्या नयनरम्य ठिकाणी सिनेमाचे चित्रीकरणाने या सिनेमातील व्यक्तीरेखात आपलेच कुटुंब प्रेक्षकांना पाहता येईल. सिनेमाला अमितराज याचे संगीत आणि मंदार चोळकर आणि सचिन पाठक यांनी मिळून सिनेमाची गाणी लिहिली आहेत. शिरीष देसाई यांनी छायाचित्रीकरण केले असून मोहित टाकळकर यांनी सिनेमाचे संकलन केले आहे. नातेसंबंधावर आधारित असलेला हा सिनेमा २९ जानेवारीत प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2015 रोजी प्रकाशित
नात्यांचे महत्त्व पटवून देणाऱया ‘बंध नायलॉनचे’चा ट्रेलर प्रदर्शित
कोकण, सासवड यासारख्या नयनरम्य ठिकाणी सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-12-2015 at 18:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandh nylon che official trailer mahesh manjrekar subodh bhave medha manjrekar sunil barve in lead role