काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज सेवन प्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना अटक झाली होती. त्यानंतर भारतीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा सोशल मीडियावर भारतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन भारतीला पुन्हा ट्रोल करण्यात आले आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भारती गाडीमध्ये बसली आहे. तिने मास्क घातले आहे. दरम्यान ती हातावर सॅनिटायझर घेते आणि हाताला चोळते. सॅनिटायझर कसे वापरायचे हे भारती व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओवरुन भारतीला ट्रोल करण्यात आले आहे. एका यूजरने तर हे सॅनिटायझर आहे, ड्रग्ज नाही असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे.
भारती व्हिडीओमध्ये एका फोटोग्राफरशी बोलत असल्याचे दिसत आहे. तो फोटोग्राफर तिला तू बिग बॉसमधील कोणत्या स्पर्धकाला पाठिंबा देते असे विचारताना दिसत आहे. त्यावर भारती मी अली गोणी, जॅस्मिन आणि राखी सावंतला पाठिंबा देते असे म्हणते.
२१ नोव्हेंबर रोजी सकाळी एनसीबीच्या पथकाने भारती सिंहच्या घरी धाड टाकली होती. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केली. त्यानंतर भारती आणि हर्ष यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. आता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची जामीनावर सुटका झाली.