‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमधून प्रकाशझोतात आलेला डान्सर आणि कोरिओग्राफर पुनीत पाठकने गर्लफ्रेंड निधी मूनी सिंहशी लग्नगाठ बांधली. लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. पुनीतच्या लग्नाला कॉमेडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया दोघांनी हजेरी लावली होती. लग्नात दोघांनीही जोरदार डान्स केला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुनीत आणि निधीसोबत भारती व तिच्या पतीने ठेका धरला. भारतीला डान्स करताना पाहून अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. ‘माल का कमाल’, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. ‘इतकी नाचू नकोस, नाहीतर एनसीबी पुन्हा तुला बोलवून घेईल’ असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. याआधी गायक आदित्य नारायणच्या लग्नातही भारती व हर्षने जोरदार डान्स केला होता. तेव्हासुद्धा हे दोघं ट्रोल झाले होते.
व्हिडीओ सौजन्य- viralbhayani
भारती व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. विशेष एनडीपएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर भारतीच्या घरावर आणि ऑफिसवर एनसीबीने धाड टाकली होती. त्या धाडीत एनसीबीला ८० ग्रॅमपेक्षा जास्त गांजा मिळाला होता.