नवं काही : ‘भौकाल २’

सिखेरा यांचे अंतिम ध्येय हे गुन्हेगारांच्या टोळ्यांनी त्रस्त असलेल्या उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर नामक शहराला गुन्हेगारी आणि गुंडगिरीतून मुक्त करण्याचे आहे.

‘भौकाल २’ ही एसएसपी नवीन सिखेरा या व्यक्तिरेखेवर आधारित कथानक असलेली वेबमालिका आहे.  सिखेरा यांचे अंतिम ध्येय हे गुन्हेगारांच्या टोळ्यांनी त्रस्त असलेल्या उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर नामक शहराला गुन्हेगारी आणि गुंडगिरीतून मुक्त करण्याचे आहे. एकूणच शहरात अराजकता आणि अशांतता पसरली असल्याने वस्तीतील लोकांना सुरक्षित ठेवण्याचेही काम सिखेरा यांना निभावायचे आहे. जेव्हा नवीन सिखेरा नवीन एसएसपी म्हणून मुझफ्फरनगरमध्ये येतात तेव्हा स्थानिक टोळ्यांच्या भीतीखाली जगणाऱ्या लोकांच्या निराशेकडे पाहून त्यांच्यासमोरील आव्हानांची जाणीव त्यांना देण्यात येते. अशी गंभीर स्थिती असताना पोलीस यंत्रणेतही सिखेरा सुधारणा आणण्याचा प्रयत्न करतात आणि शहराचा ताबा मिळविण्यासाठी आसुसलेल्या देढा नामक गुन्हेगारांच्या टोळीला अटक करण्यासाठी ते जिवाचं रान करतात. मुझफ्फरनगरचे चित्र सिखेरा पालटू शकतील का? आणि त्यांनी शहरात सुरू केलेले बदलाचे काम ते पूर्ण करू शकतील का? याचे थरारक चित्रण ‘भौकाल २’ मधून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘भौकाल २’ ही गुन्हेगारी विश्वातील कथा असून अभिनेता मोहित रैना हे या वेबमालिकेचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. याचे दिग्दर्शन जतीन वागळे यांनी केले आहे. 

कलाकार – मोहित रैना, बिदिती बाग, सिद्धार्थ कपूर, अभिमन्यू सिंग आणि उपेन चौहान, कधी – २० जानेवारीला प्रदर्शित, कुठे – एमएक्स प्लेअर

‘अनपॉज्ड – नया सफर’

‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ची नवी वेबमालिका ‘अनपॉज्ड – नया सफर’मधून कोविड महामारीमुळे आत्तापर्यंत एकूणच मानवी जग, आयुष्य, जीवनशैली, नाती आणि भावना यांचे द्वंद्व कसे बदलले आहे याचे समर्पक चित्रण करण्यात आले आहे. प्रत्येकाची जीवनशैली कशा पध्दतीने अंतर्बाह्य बदलून गेली आहे, तसेच जगण्याचे महत्त्व काय हे किती स्पष्ट झाले आहे हे दाखवणाचा प्रयत्न पाच हिंदी कथासंग्रह असलेल्या ‘अनपॉज्ड – नया सफर’ या वेबमालिकेतून पाहायला मिळतो. शिखा माकन, रुचिर अरुण, नूपुर अस्थाना, अयप्पा के.एम. आणि नागराज मंजुळे यांनी या पाच कथा प्रेक्षकांसमोर जिवंत केल्या आहेत. ‘द कपल’, ‘गोंद के लड्डू’, ‘टीन टीगाडा’, ‘वैंकुठ्य’, ‘वॉर रूम’ अशा पाच कथा यात पाहायला मिळणार आहेत. याआधी करोनाकाळातील कथेवर आधारित ‘अनपॉज्ड’ ही वेबमालिका प्रदर्शित झाली होती.

कलाकार –  श्रीया धनवर्थी, प्रियांशू पैन्युली, नागराज मंजुळे, साकिब सलीम , गीताजंली कुलकर्णी आणि नीना कुळकर्णी , कधी – २१ जानेवारीला प्रदर्शित,

कुठे – अमेझॉन प्राईम 

कपिल शर्मा -आय अ‍ॅम नॉट डन येट…

कपिल शर्मा गेली पंधरा वर्षे आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांची मने जिंकून घेतो आहे. आपल्या ‘कपिल शर्मा शो’मधून घराघरात पोहचलेला विनोदवीर कपिल शर्मा ‘नेटफ्लिक्स’च्या ‘कपिल शर्मा झ्र आय एम नॉट डन येट’ या स्टॅण्डअप कॉमेडी शोमधून आपल्या जीवनप्रवासाची रंजक कहाणी सांगणार आहे. अमृतसरमधील त्याच्या लहानपणीच्या आणि किशोरवयीन दिवसांपासून आपल्या मद्यपानाचे व्यसन आणि ते किस्से, अगदी समाजमाध्यमांवरील ट्र्रोंलगपासून ते आपल्या विनोदाच्या प्रसिद्धीपर्यंतचा प्रवास तो आपल्याच अनोख्या शैलीतून या आपल्या पहिल्या वहिल्या नेटफ्लिक्स ओरिजनल शोमधून चाहत्यांसमोर आणतो आहे. या कार्यक्रमातून त्याचे मित्र, परिवार आणि अनेक हिर्तंचतकही पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

कलाकार – कपिल शर्मा, कधी – २८ जानेवारीला प्रदर्शित, कुठे – नेटफ्लिक्स

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhokal 2 ssp sikhera plot based on personality web series free from crime and bullying akp

Next Story
‘फास’ चित्रपट प्रेक्षकभेटीला…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी