छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बॉलिवूडचा भाईजान सलामान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १४ वे पर्व सध्या चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात आणखी एका अभिनेत्रीची स्पर्धक म्हणून एण्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून देवोलीना भट्टाचार्जी आहे. बिग बॉसच्या घरात अभिनेत्री निक्की तांबोळी आणि देवोलीना यांच्यामध्ये एका टास्क दरम्यान भांडणे होतात. त्यावेळी निक्की देवोलीनाला आधीच्या सीझनमध्ये केलेल्या MeTooच्या आरोपांवरुन चिडवताना दिसते.

कर्लस टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये त्यांची भांडणे दिसत आहेत. शो मध्ये येताच देवोलीनाचे निक्कीशी भांडण झालं आहे. बुधवारी प्रदर्शित झालेल्या भागात या दोघींमध्ये भांडण पाहायला मिळाले आहे. त्या भांडणात निक्कीने बिग बॉसच्या १३व्या पर्वात झालेला MeTooचा मुद्दा उचलला आहे.

काय आहे प्रकरण?

बिग बॉसच्या १३व्या पर्वात MeToo आरोपांवरुन बराच गोंधळ झाला होता. जेव्हा फराह खान बीबी अदालतमध्ये न्यायाधीश म्हणून आली होती. तेव्हा ती देवोलीनाला प्रचंड ओरडली होती आणि तिने देवोलीनाला MeToo सारखे गंभीर आरोप केल्याबद्दल सुनावलं होतं. फराह तिला म्हणाली होती की, “MeToo हा एक पत्ता नाही. जो तुला हवा तेव्हा तू वापरशील. हा एक गंभीर आरोप आहे.”

२०१८ मध्ये #MeToo या मोहिमेने चांगलाच जोर धरला होता. या आरोपांमुळे कलाविश्वातील काही दिग्गज कलाकारांचीही नावे चर्चेत आली होती.