बिग बॉसचे १४ वे पर्व सध्या चर्चेत आहे. नुकताच शोमध्ये विकास गुप्ता आणि अर्शी खानची एण्ट्री झाली. पण त्या दोघांमध्ये सतत भांडणे होत असल्याचे दिसत आहे. बुधवारी झालेल्या एपिसोडमध्ये अर्शी खानने विकास गुप्तावर आरोप केले आहेत.

अर्शी आणि विकास बिग बॉसच्या घरात नाश्ता बनवत असतात. दरम्यान दोघांमध्ये भांडणे सुरु होतात. तेव्हा ते दोघे एकमेकांसोबत कधी काम करणार नाही असे बोलताना दिसतात. भांडण करत असताना विकासचा अर्शीच्या हाताला स्पर्श होतो. त्यानंतर त्या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु होते.

विकास आणि अर्शीची भांडणे पाहून बिग बॉस त्यांना कन्फेशन रुममध्ये बोलवतात. त्यावेळी अर्शी म्हणाली, विकासने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तो सतत मला त्रास देत असतो. अर्शीने केलेले आरोप ऐकून विकास गुप्ता चिडतो आणि अर्शी खोट बोलत असल्याचे सांगतो. सध्या बिग बॉसच्या घरात अर्शी खान आणि विकास गुप्ता यांच्यामध्ये सतत भांडण होतान दिसत आहे.