छोट्या पडद्यावरील कायम चर्चेत राहणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी. यंदा या शोचं दुसरं पर्व सुरु आहे. मात्र या पर्वामध्ये पहिल्या पर्वाची जी मज्जा होती ही कुठेतरी मिसिंग आहे. बिग बॉसचं पहिलं पर्व त्याकाळी विशेष गाजलं होतं. हे पहिलं पर्वच नाही तर घरातील स्पर्धकही विशेष चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांची लोकप्रियता आजही प्रेक्षकांमध्ये आहे. त्यातच पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे आणि रेशम टिपणीस यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं होतं. त्यामुळे बिग बॉसच्या २ पर्वामध्ये या दोघींना अनेक प्रेक्षक मिस करत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठीच या दोघींनी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहेत. इतकंच नाही तर या पर्वामध्ये त्यांनी एक टास्कदेखील खेळला आहे.

नुकत्याच झालेल्या कॅप्टनसी टास्कमध्ये शिवच्या एका चुकीमुळे किशोरी शहाणे यांना कॅप्टन होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या निरीक्षणाखाली घरात पहिलं कार्य रंगणार आहे. विशेष म्हणजे या कार्यामध्ये मेघा धाडे आणि रेशम टिपणीस यांनी सहभाग घेतला असून आज त्या प्रेक्षकांना टास्क खेळताना दिसणार आहेत.त्यामुळे घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांमध्येही उत्साहाच वातावरण पसरलं आहे.

मेघा आणि रेशम यांनी घरात एण्ट्री केल्यानंतर अनेक नवनवीन गोष्टी घडल्या आहेत. काही काळासाठी घरात आलेल्या या दोघींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्यासोबतच सुशांत शेलारनेदेखील घरात हजेरी लावली आहे.