जवळपास १०० दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला सुरुवात झाली आणि आता या शोचा ग्रँड फिनाले अवघ्या एका दिवसावर येऊन ठेवला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेकडे लक्ष लागून राहिलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात जितकी धमाकेदार झाली तितकाच धमाकेदार याचा शेवट होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. बिग बॉस मराठीच्या घरामधून जे स्पर्धक बाहेर पडले ते देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. अंतिम फेरीमध्ये सहा स्पर्धक पोहोचले असून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

ग्रँड फिनालेसाठी अंतिम फेरीत पोहोचलेले सहा स्पर्धकसुद्धा परफॉर्म करणार आहेत. ज्यामध्ये मेघा, शर्मिष्ठा, आस्ताद, स्मिता, पुष्कर, सई यांचे अफलातून डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. रेशम टिपणीस, जुई गडकरी, ऋतुजा, सुशांत शेलार, राजेश शृंगारपुरे यांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. रेशम टिपणीस खल्लास आणि नागीन या गाण्यांवर तर जुई – ऋतुजा आली रे आणि धाकड या गाण्यांवर डान्स करणार आहेत. तेजस पुजारीने नृत्यदिग्दर्शन केले आहे.

Bigg Boss Marathi : जाणून घ्या, रेशमबद्दलच्या चर्चांविषयी काय म्हणतोय राजेश श्रुंगारपुरे

बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले रविवारी रात्री सात वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.