१९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाल सुरुवात करणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण. आज २ एप्रिल रोजी अजयचा वाढदिवस आहे. अजय बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्याच्या शांत स्वभावासाठी विशेष ओळखला जातो. अजयने आता पर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याने प्रत्येक चित्रपटासाठी चांगले मानधन देखील घेतले आहे. अजयने पत्नी काजोलसोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अजयच्या वाढदिवसा निमित्त चला जाणून घेऊया त्यांची लव्ह स्टोरी…

अजय आणि काजोलची पहिली भेट १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काजोलने तिची लव्हस्टोरी सांगितली आहे. ‘मी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तयार झाले होते आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांना चित्रपटात माझ्यासोबत हिरोची भूमिका कोण साकारणार आहे असे विचारत होते. कोणीतरी अजयकडे इशारा केला. तो एका कोपऱ्यात बसला होता. त्यानंतर चित्रपटाच्या सेटवर आमच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले’ असे काजोल म्हणाली.

Birthday Special : अजय देवगणविषयी काही खास गोष्टी

काजोल पुढे म्हणाली, ‘जेव्हा मी अजयच्या आयुष्यात आले तेव्हा तो दुसऱ्या मुलीला डेट करत होता. तसेच मी देखील माझ्या बॉयफ्रेंडची तक्रार त्याच्याकडे करायची. त्यानंतर माझा ब्रेकअप झाला. आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलेले नाही. पण आम्ही एकत्र असल्याचे आम्हाला वाटायचे.’

२०२१मध्ये अजय मालामाल? या वर्षात बिग बजेट चित्रपटांचा पाऊस!

अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते. कजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातील देखील लग्नासाठी तयार झाले. त्यांनी १९९९मध्ये लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. अजय आणि काजोलच्या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.