बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो प्रतिक्रिया देत असतो. यावेळी अनुराग चक्क कोरियन पॉप बँड BTS मुळे चर्चेत आहे. त्याने BTSचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये BTS ग्रुप चक्क सलमान खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
अवश्य पाहा – अखेरच्या काळात पंचमदांना काम का मिळालं नाही?; जावेद अख्तर म्हणाले…
This is so good https://t.co/shOchLlpWj
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) June 28, 2020
अवश्य पाहा – “सलमानला खरंच कलाकार म्हणावं का?”; Wikipedia पेज पोस्ट करुन अभिनेत्याने उडवली खिल्ली
BTS ग्रुप जबरदस्त डान्स आणि अफलातून गाण्यांसाठी ओळखला जातो. अनुरागने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ते सलमान खानच्या ‘चुनरी चुनरी’ या गण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा डान्स पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
BTS हा कोरियामधील एक लोकप्रिय पॉप बँड आहे. त्यांनी आजवर ‘बॉय विथ लव्ह’, ‘फेक लव्ह’, ‘ब्लॅक स्वान’, ‘डीएनए’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांची निर्मिती केली आहे. हा म्युझिक ग्रुप सध्या भारतातही लोकप्रिय होऊ लागला आहे. त्यांची गाणी भारतातही मोठ्या आवडीने ऐकली जातात.