जगप्रसिध्द एस्ट्रोलॉजर संदीप कोचर यांनी आजपर्यंत देश-विदेशामध्ये अनेक रेडिओ आणि टीव्ही शो केले आहेत. विविध वाहिन्यांवर त्यांनी आपले कार्यक्रम सादर केले असून आजपर्यंत हजारो लोकांना त्यांच्या भविष्याबाबत काही बाबी कथन केल्या आहेत. आता संदीप कोचर हे एका मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रातही आपले पाऊल टाकत आहेत. आगामी मराठी चित्रपट ‘भविष्याची ऐशी तैशी- द प्रेडिक्शन’ मध्ये अभिनेता म्हणून संदीप प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
वाचा : मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ चित्रपट ‘ऑस्कर’च्या शर्यतीत
संदीप यांनी या अगोदर झी न्यूज वर ‘किस्मत के सितारे’द्वारे नऊ वर्षे लोकांना त्यांचे भविष्य सांगितले. त्या नंतर ‘किस्मत कनेक्शन संदीप कोचर के साथ’ हा एक शोसुद्धा केला. याशिवाय त्यांचे शो दुबईच्या रेडिओ स्पाईस, सिंगापूरच्या रेडिओ मस्ती, लंडनच्या लाईका रेडीओ, सनराईज रेडीओ आणि बी बी सी रेडीओ वर नियमितपणे सुरु आहेक.
वाचा : ‘माहिरा, पाकिस्तानमध्ये परत येऊ नकोस’
चित्रपटात ते भविष्यकार डॉ.करमरकर यांची भूमिका साकारणार आहेत. संदीप यांच्यासोबत चित्रपटात रुचिता जाधव, मानसी नाईक, हर्षली जिने यांच्याही भूमिका आहेत. तीन मुलींच्या कथानकाभोवती हा चित्रपट फिरतो.या चित्रपटात जोतिष आणि त्याच्या प्रभावाबद्दल सांगितले आहे. मात्र हा चित्रपट अंधाविश्वासाला बळ देणार नसल्यचा दावा निर्माते व दिग्दर्शकांनी केला आहे. किंबहुना आम्हीही अंधश्रद्धेला थारा देत नाही असे सांगितले.