बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो. परंतु यावेळी कार्तिक कुठल्याही फोटोमुळे नव्हे तर त्याच्या दाढीमुळे चर्चेत आहे. लहान मुलांनी कार्तिकच्या दाढीवर एक गाणं तयार केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर

अवश्य वाचा – अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कुत्र्याने केला हल्ला; करावी लागली प्लास्टिक सर्जरी

लॉकडाउनच्या काळात कार्तिकने आपली दाढी कमालीची वाढवली आहे. या अवतारात तो एखाद्या साधू बाबा सारखा दिसत आहे. कार्तिकच्या या नव्या लूकमुळे त्याला सोशल मीडियावर बाबा म्हणून चिडवलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांनी त्याच्यावर एक गाणं देखील तयार केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ कार्तिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

‘मुंह साधू जैसे हो गया है, की करिये की करिये…’ असे या गाण्याचे बोल आहेत. ‘दिल चोरी साडा हो गया’ या लोकप्रिय बॉलिवूड गाण्याच्या रिदमवर या गाण्याची निर्मिती मुलांनी केली आहे. हे लक्षवेधी गाणं ऐकून तुम्हाला देखील आपलं हसू आवरता येणार नाही. दरम्यान या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.