‘रामायणा’त सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाला ओळखणंही अशक्य | Loksatta

‘रामायणा’त सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाला ओळखणंही अशक्य

मालिकेनंतर दीपिकानं काही चित्रपटातही काम केलं मात्र त्यानंतर रुपेरी पडद्याशी त्यांचं नातं कायमचं तुटलं.

‘रामायणा’त सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाला ओळखणंही अशक्य
रामायण

‘रामायण’ ही मालिका त्या काळी भारतात सर्वाधिक गाजली. दर रविवारी मालिका सुरू झाली की रस्ते ओस पडू लागायचे. ज्यांच्या घरी टीव्ही त्यांच्याघरी शेजारीपाजारी गोळा होत. काहीजण मालिका सुरु होण्याआधी अगदी टी.व्हीला हार घालत, फुलं ठेवतं. अशाही कित्येक आठवणी लोक या मालिकेबद्दल सांगतात. या मालिकेत दीपिका चिखालिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली सीता आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहे.

रामायण मालिकेला २५ वर्षांहून अधिक काळ उलटून गेला मात्र दीपिकानं साकारलेली सीता लोकांना आजही लख्ख आठवते. मालिकेनंतर दीपिकानं काही चित्रपटातही काम केलं मात्र त्यानंतर रुपेरी पडद्याशी त्यांचं नातं कायमचं तुटलं. पण आता एका कार्यक्रमानिमित्त दीपिका समोर आल्या. देबिना बॅनर्जीनं दीपिका यांच्यासोबतचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

देबिनानं देखील सीतेची भूमिका साकारली होती. ही भूमिका साकारताना तिला दीपिका यांची खूपच मदत झाली होती. जुन्या रामयणच्या सीडी पाहून देबिनानं दीपिका यांच्या अभिनयातून अनेक लहान सहान गोष्टी शिकून घेतल्या. त्यामुळे दीपिका यांना भेटण्याचा योग आल्यानं देबिनाचा आनंदही गगनात मावेनासा झाला. त्यामुळे या अनमोल भेटीचे खास क्षण देबिनानं शेअर केले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-07-2018 at 10:28 IST
Next Story
मिका सिंगच्या घरात चोरी, ३ लाखांचा ऐवज लंपास