बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. २०१८ मध्ये लग्न केलेल्या या जोडीची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. त्यामुळे त्यांच्याविषयी कोणतीही माहिती समोर आली की ती वाऱ्यासारखी पसरते. त्यातच काही दिवसापूर्वी दीपिकाने इन्स्टाग्रामवर लहान बाळाचे फोटो शेअर केले. त्यामुळे दीपिका आई होणार का? असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यातच या फोटोवर रणवीरने जी कमेंट केली ती पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये खरोखरचं संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
दीपिकाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एका लहान मुलाचे फोटो शेअर केले होते. दिवाळीनंतरचं सेलिब्रेशन असं कॅप्शनही दीपिकाने या फोटोला दिलं होतं. त्यामुळे दीपिका आई होणार का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. त्यातच हा फोटो पाहिल्यानंतर रणवीरनेही त्यावर भन्नाट कमेंट केली. त्याने एक हार्टशेपची इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. त्याची ही कमेंट पाहिल्यानंतर चाहत्यांना खरंच प्रश्न पडला आहे.
“काही चाहत्यांनी दीपिका प्रेग्नंट आहे का”? असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी “तुम्ही बेबी प्लानिंग करताय का”? असंही काहींनी विचारलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये दीपिकाने अद्याप आम्ही बाळाचा विचार करत नसल्याचं म्हटलं होतं.मात्र तरीदेखील चाहत्यांमध्ये तिच्या प्रेग्नंसीबद्दलच्या चर्चा होत असतात. सध्या दीपिका ‘छपाक’ आणि ’83’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. याशिवाय ‘महाभारत’ या चित्रपटात ती द्रौपदीच्या भूमिकेत दिसणार आहे.