बॉलिवूडचा बाजीराव, अभिनेता रणवीर सिंग त्याच्या दिलखुलास अंदाजामुळे अनेकांची मने जिंकत असतो. त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. रणवीर त्याच्या आयुष्याशी संबंधीत अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. नुकताच त्याने केलेल्या फोटोशूटमधील फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर बॉलिवूडमधील बाजीरावच्या मस्तानीने उर्फ दीपिका पदुकोणने सर्वांना हसू येईल अशी कमेंट केली आहे.
नुकताच जेबीएल कंपनीने रणवीर सिंगला ब्रँड अॅम्बेसिडर बनवले. त्यामुळे रणवीरने जेबीएल स्पीकरसह फोटोशूट केले. या फोटोशूटमधील काही फोटो रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रणवीरने पिवळ्या रंगाचा हूडी आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. त्यावर त्याने पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. रणवीरचा हा स्टनिंग लूक अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा आहे. सध्या रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रणवीरने शेअर केलेल्या या फोटोवर पत्नी दीपिकाने केमेंट केली आहे. फोटोशूटमधील रणवीरच्या लूकपेक्षा दीपिकाने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दीपिकाने ‘यार घरी येताना एक दोन स्पीकर घेऊन ये. आपले पैसे वाचतील’ असे कमेंटमध्ये लिहित फनी इमोजी वापरले आहेत. तिची हि कमेंट वाचून अनेकांना हसू आले आहे. दीपिकाच्या या कमेंटवर चाहत्यांनी रिप्लाय दिला आहे.
आणखी वाचा : २२ वर्षांनी लहान मुलीच्या प्रेमात पडला अनुराग कश्यप
दीपिकाने रणवीरच्या फोटोवर पहिल्यांदाच कमेंट केलेली नाही. बऱ्याच वेळा ते दोघे एकमेकांच्या फोटोवर कमेंट देत असतात, एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. रणवीर आणि दीपिका लवकरच ’83’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच ते दोघे एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांची चित्रपटाबाबची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.