बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण विनाकारण वादात अडकली आहे. मॅक्झिम मासिकावरील दीपिकाचा एक फेक न्यूड फोटो सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. मासिकाच्या कव्हर पेजवर ती पुरुष मॉडेलसह पोज देताना दिसते. मॅक्झिमने जाहीर केलेल्या १०० हॉट अभिनेत्रींच्या यादीत नुकतेच दीपिकाला स्थान मिळाले होते. त्यानंतर आता या एका आक्षेपार्ह फोटोमुळे विनाकारण तिला नव्या वादाला तोंड द्यावे लागत आहे. कव्हर पेजवर बॉलिवूड अभिनेत्रींना बोल्ड अवतारात दाखविण्याची मॅक्झिम मासिकाची ही काही पहिलीच वेळ नाही. करिना कपूर खान, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन या अभिनेत्रींनाही मासिकाच्या कव्हरवर मॉर्फ करुन दाखविण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : ‘१५ कोटी घेऊन नवऱ्याचा वाढदिवस साजरा करते’

या एका फोटोमुळे दीपिका सर्वांच्याच चर्चेचा विषय झाली आहे. ही ३१ वर्षीय अभिनेत्री सध्या संजय लीला भन्साळी याच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, रणवीर सिंगसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधांबद्दलही बऱ्याच चर्चा सुरु आहेत. या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असतानाच दीपिकाचा हा धक्कादायक फोटो व्हायरल झालाय. फोटोमध्ये दीपिका आणि तिच्यासोबत असलेला मॉडेल पूर्ण नग्न दाखविण्यात आले असून, कमरेखालील भाग फोटोशॉपमध्ये धुसर करण्यात आलाय. मॅक्झिम मासिकाच्या मूळ कव्हरवर फोटोशॉप करून काही विकृत लोकांनी हा फोटो व्हायरल केलाय.

वाचा : ‘हमारा पाकिस्तान’ बोलून गायक मिका फसला; मनसेची धमकी

सेलिब्रिटींना त्यांच्याभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय, स्टारडम याचाही कधी कधी फटका बसतो. खास करुन महिला सेलिब्रिटींना याची मोठी किंमत मोजावी लागते. पण, अशा विकृत गोष्टी थांबवणेही आपल्याच हातात असते. सोशल मीडिया किंवा व्हॉट्स अॅपवरून अशा गोष्टी तुमच्यापर्यंत आल्यास त्याला शेअर करु नये.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone fake nude magazine cover viral on social media whats app