दीपिका पादुकोण ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजच्या चौथ्या भागातही काम करणार आहे. ट्रिपल एक्सचे दिग्दर्शक डी.जे. कारुसो याने स्वतः ही माहिती ट्विटरवर दिली. कारुसोने ट्विट केलेलं की, ‘ट्रिपल एक्स’ या सिनेमाची कथा आणि चित्रीकरणाच्या वेळा यासाठी पुढच्या आठवड्यात एक मीटिंग घेण्यात येणार आहे. त्याच्या याच ट्विटवर दीपिकाच्या एका चाहत्याने कारुसोला ‘ट्रिपल एक्स ४’ मध्ये दीपिका असेल की नाही असा प्रश्न विचारला असता कारुसोने पुढच्या सिझनमध्येही दीपिका असणार असे स्पष्ट सांगितले.

दहावीच्या परीक्षेतही ‘सैराट’च्या आर्चीची ‘फर्स्ट क्लास’ कामगिरी

दीपिकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा ‘ट्रिपल एक्स रिटर्न ऑफ झेंडर केज’ने जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दीपिकाचा हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांना फारसा आवडला नसला तरी या सिनेमाने ३०.८ कोटी डॉलरपेक्षाही जास्त कमाई केली होती. या सिनेमाने जॅकी चॅनच्या ‘कुंग फू योगा’ सिनेमापेक्षाही जास्तीची कमाई केलेली. कुंग फू योगाने १,६३२ कोटी रुपयांची कमाई केलेली. या सिनेमाने चीनमध्ये १० दिवसांत १३.७ कोटी डॉलरची कमाई केली होती.

https://twitter.com/Nick_Ksg/status/874111115923533826

दीपिकाचा आतापर्यंत सर्वात हिट ठरलेला ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा होता. पण ‘ट्रिपल एक्स’च्या प्रदर्शानंतर सर्वात हिट सिनेमाच्या यादीत ‘ट्रिपल एक्स’चे नाव अग्रणी येते. या सिनेमात दीपिकासोबत विन डिझेल, चीनी अभिनेता डॉनी येनने काम केले होते. बॉक्स ऑफिसच्या स्पर्धेत ट्रिपल एक्ससोबत ‘कुंग फू योगा’ हा सिनेमा होता. पण तरीही या सिनेमानेच शेवटपर्यंत बॉक्स ऑफिसवर पकड कायम राखली होती.

भारतात या दोन्ही सिनेमांना थंड प्रतिसाद मिळाला. ‘ट्रिपल एक्स’ने पहिल्या आठवड्यात ५४ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जॅकी चॅन, सोनू सूद, दिशा पटानी आणि अमायरा दस्तूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘कुंग फू योगा’ या सिनेमाला अतिशय थंड प्रतिसाद मिळाला होता. जॅकी आणि दीपिकाने दोघांनीही आपले सिनेमे भारतात प्रमोट केले होते. सध्या दीपिका, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्यासोबत पद्मावती सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. पद्मावती सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी करत आहेत. भन्साळी यांचा हा तिसरा सिनेमा आहे ज्यात दीपिका आणि रणवीर एकत्र काम करत आहेत.