मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेलं नाव म्हणजे दिग्दर्शक संजय जाधव. संजय जाधवने आतापर्यंत दिग्दर्शित केलेला प्रत्येक चित्रपट हिट ठरला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटांमुळे अनेक कलाकारांचं नशीब फळफळलं आहे. आता संजय जाधव महाभारतावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. प्रेक्षकांसाठी हा सुखद धक्काच आहे.

महाभारत या पौराणिक कथेचे महत्त्व भारतीय मंडळींना वेगळे सांगण्याची गरज पडत नाही. हेच महाभारत, छोट्या पडद्याच्या माध्यमातून पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळालेली आहे. आता महाभारत चित्रपटाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटील येणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या आहेत.

अर्थात, संजय दादा ‘महाभारत’ घेऊन येणार असल्याने, सिनेमात ‘कोण कलाकार असणार?’ हा प्रश्न सध्या खूपच चर्चेत आहे. स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, साई ताम्हणकर ही संजय दादांच्या सिनेमातून नेहमी दिसणारी मंडळीच ‘महाभारत’मध्ये पाहायला मिळणार, की नव्या कलाकारांना संधी मिळणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आता पर्यंत संजयने ‘दुनियादारी’, ‘खारी बिस्कीट’, ‘लकी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘तू हि रे’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘साडे माडे ३’, ‘गुरु’, ‘मुंबई मेरी जान’ असे अनेक चित्रपट केले आहेत. तसेच त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट देखील ठरले आहे.