आयफा पुरस्कार २०१९ ( IIFA Awards 2019 ) सोहळा बॉलिवूड कलाकारांच्या स्टाईलिश अंदाजामुळे चर्चेत राहिला. नुकत्याच पार पडलेल्या आयफाने यंदा २० वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या सोहळ्यात अनेक गंमतीशीर घटना घडल्या. सध्या IIFA 2019 मधील एक व्हिडीओ सगळीकडे खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक अभिनेत्री चक्क एका कुत्र्याची मुलाखत घेताना दिसत आहे.

एक कुत्रा सलमान खानचा पाठलाग करत थेट ग्रीन कारपेटवर आला. अचंबित करणारे हे दृष्य पाहून सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. दरम्यान अभिनेत्री अदिती भाटिया हिने त्या कुत्र्याची मुलाखत घेतली. या गंमतीशीर मुलाखतीचा व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे.

तुला सलमान खानचा पाठलाग करुन कसे वाटले? तुला या पुरस्कार सोहळ्यात येऊन कसे वाटले? तुला कोणत्या व्यक्तिरेखेसाठी पुरस्कार मिळेल असे वाटते? यांसारखे अनेक प्रश्न अदितीने त्या कुत्र्याला विचारले. या तिच्या प्रश्नांवर कुत्र्याने आपले हात वर करुन प्रतिक्रीया दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत असुन अनेकांनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. तर काहींनी पुरस्कार सोहळ्यातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.