कुख्यात डॉन दाउद इब्राहिमला जीवे मारण्याचा निश्चय करणाऱ्या सपनाचा जीवनप्रवास ‘एक थी बेगम’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना पहायला मिळाला. एम एक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्य घटनांवर प्रेरित सीरिज ‘एक थी बेगम’च्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. यातील साहसी आणि धाडसी अशरफ उर्फ सपनाने घातक स्त्री बनून पतीच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली. तिने तिरस्काराची परिसीमा गाठली. तिने सर्व बाबी स्वतःच्या हातात घेतल्या आणि एका अशा वळणावर येऊन सिझन १ चा शेवट झाला, जिथे अशरफचे आयुष्य शिल्लक आहे की नाही, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित ‘एक थी बेगम २’ लीला पासवान या महिलेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिचे नाव प्रामुख्याने पुरुषांच्या जगातच प्रसिद्ध नसून अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारणीही तिच्या शोधात आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ek thi begum season 2 coming soon avb