भट कॅम्पमध्ये तयार झालेला दिग्दर्शक असा शिक्का असल्याने थरारपट असूनही ‘एक व्हिलन’चे संगीत उत्तम असावे याकडे मोहित सुरीने बारकाईने लक्ष दिले आहे. वास्तविक ‘आशिकी २’मुळे या दिग्दर्शकाकडून थरारपटाचा विषय कसा हाताळला असेल आणि खासकरून कलावंतांची फळी चांगली असल्यामुळे
गुरू हा अनाथ तरुण आपल्या आई-वडिलांच्या हत्येचा बदला घेतो आणि गुन्हेगारीकडे वळतो. प्रचंड असंतोष त्याच्या मनात कायम खदखदत राहतो. मरणाची भीती नष्ट होते. कारण जगण्याचे कारण, उद्देश त्याला मिळत नाही. पण आयेशा भेटते आणि त्याचे आयुष्य नवे वळण घेते. चित्रपटाला आणखी एक समांतर कथानक असून त्यात राकेश महाडकर मराठी मध्यमवर्गीय तरुण दाखविण्यात आला आहे. मध्यमवर्गीय जगण्यातील घुसमट, नोकरीत अपयश, बायकोसह सतत सर्वाची बोलणी खाण्याचे प्रसंग यामुळे कातावलेला राकेश नकळत हिंस्र बनतो. आयेशा-गुरू-राकेश असा हा त्रिकोण असला तरी प्रेमत्रिकोण नाही. यातला खलनायक कोण हे चित्रपट उलगडून सांगतो.
प्रत्येक प्रेमकथेत एक खलनायक असतोच अशी या चित्रपटाची ‘टॅगलाइन’ असल्यामुळे त्या टॅगलाइनला अनुसरून पडद्यावर कथानक उलगडते. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असली तरी गुरू हा मनाने अतिशय चांगला आहे असे दाखवले आहे. मूळ कोरियन चित्रपटाचे बॉलीवुडीकरण केल्याशिवाय प्रेक्षकांना रुचणार नाही, अशी जणू खूणगाठ बांधली असल्यामुळे हा थरारपट अधिक गुंतवून ठेवण्यात अपयशी ठरला आहे. भट कॅम्पमधील असल्याने दिग्दर्शकाला कारागिरी उत्तम जमली आहे. धक्कातंत्र, फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करून गोष्ट उलगडून सांगण्याचा प्रयत्न, त्याला छायालेखन आणि उत्तम संगीताची साथ लाभली आहे.
तेरी गलियाँ, जरूरत आणि हमदर्द ही गाणी श्रवणीय आहेत. प्राची देसाईचे आयटम साँग, वृद्ध व्यक्तींचे लग्न जमविणे वगैरेसारखा तद्दन फालतू भाग असे बॉलीवूड मसाला गाष्टींचा भडिमार या चित्रपटातही आहेच. त्यामुळे नवे काही पाहायला मिळेल ही अपेक्षा फोल ठरते.
गुरूच्या भूमिकेतील सिद्धार्थ मल्होत्रा उंच, धिप्पाड असल्यामुळे पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ दिसतो. पण त्याला गुरू ही भूमिका अजिबात पेललेली नाही हे जाणवते. रितेश देशमुख, त्याचा वावर, त्याचा अभिनय हा चित्रपटात विलक्षण प्रभावी ठरला आहे. श्रद्धा कपूर अजून नवीन आहे, त्यामुळे वेगळ्या छटा असलेली आयेशा ही व्यक्तिरेखा तिला चांगली साकारता आलेली नाही. रितेश देशमुखने डोळ्यांतून खुनशीपणा चांगला दाखविला आहे. आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीतील विनोदी भूमिकांच्या बाहेर जाऊन त्याने केलेल्या प्रयत्नांमुळे इथून पुढे त्याला वेगळ्या पद्धतीच्या भूमिकांसाठी विचारणा होऊ शकेल इतकी छाप राकेश या भूमिकेद्वारे पाडण्यात रितेश देशमुख यशस्वी ठरला आहे.
संगीत आणि धक्कातंत्र यामुळे पुढे काय होणार, याची उत्कंठा प्रेक्षकाला वाटते; परंतु खलनायकाचा चेहरा दिसल्यानंतरही बॉलीवूड मसालापटासारखा चित्रपट सुरू राहतो त्यामुळेही कंटाळा येतो. रितेश देशमुखने
एक व्हिलन
निर्मात्या – एकता कपूर, शोभा कपूर
दिग्दर्शक – मोहित सुरी
लेखक – तुषार हिरानंदानी, मिलाप मिलन झवेरी
छायालेखक – विष्णू राव
संकलक – देवेन मुरुडेश्वर
संगीत – अंकित तिवारी, मिथुन, सोच (बॅण्ड)
कलावंत – श्रद्धा कपूर, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, आम्ना शरीफ, कमाल आर. खान, शाद रंधावा, रेमो फर्नाडिस.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2014 रोजी प्रकाशित
संगीतमय थरारपट
भट कॅम्पमध्ये तयार झालेला दिग्दर्शक असा शिक्का असल्याने थरारपट असूनही ‘एक व्हिलन’चे संगीत उत्तम असावे याकडे मोहित सुरीने बारकाईने लक्ष दिले आहे.
First published on: 29-06-2014 at 04:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ek villain review sidharth malhotra is watchable