अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हे पुन्हा एकदा त्यांच्या हृदान आणि रेहान या मुलांसाठी एकत्र आले आहे. सध्या हे कुटुंबिय ओरलँडो येथे व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. हृतिक आणि सुझान त्यांचे मित्र परिवार सोनाली बेंद्रे- बेहल आणि गायत्री जोशीसोबत सुट्यांचा आनंद लुटत आहेत. सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या व्हेकेशनचे मुलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले. सोनालीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती गायत्री, हृतिक आणि सुझानसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना तिने म्हटले की, जादुई अनुभव नेहमीच चांगला असतो पण तो अनुभव आपल्या प्रियजनांसमवेत घेतला तर तो अधिक अविस्मरणीय ठरतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द कपिल शर्मा शो’मध्ये जाण्यासाठी इरफान पठाण करतोय तरुणांना मदत

हृतिक आणि सुझान अनेक दिवसांनी एकत्र दिसले आहेत. २०१४ मध्ये लग्न बंधनातून विभक्त झाल्यानंतरही या दोघांनी चांगले संबंध प्रस्तापित केले आहेत. आज ते नवरा- बायको नसले तरी ते खूप चांगले मित्र आहेत. आजही ते अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये एकत्र येतात. सुझानने हृतिकच्या ‘काबिल’ सिनेमाचे प्रमोशनही केले होते.

आपल्या पालकांची लाज काढणाऱ्या तरुणाला अमिताभ यांनी सुनावले

याआधी हृतिकने त्याच्या मुलांचे फोटो शेअर करुन दोघांमधले संभाषण सांगितले होते. या फोटोलाही लाखो लाइक्स मिळाले होते. जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काबिल’ या सिनेमात हृतिकसोबत अभिनेत्री यामी गौतमही दिसली होती. हृतिक लवकरच विकास बेहल याच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. पटना येथील गणिताचे शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. याशिवाय ‘क्रिश ३’ सिनेमाची तयारीही जोरात सुरू आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex couple hrithik roshan and sussanne khan take sons on a vacation and continue to give us family goals see photos