रहस्यमय हिमालयीन योग्याची गोष्ट सांगणारा ‘फकिरीयत’ हा संतोष मांजरेकर दिग्दर्शित हिंदी चित्रपट येत्या नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘फकिरीयत’ चित्रपटाची निर्मिती भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या पुस्तकांवर आधारित आहे.
‘फकिरीयत’चे पटकथालेखन अनिल पवार यांनी केले असून संवादलेखनही त्यांचेच आहे. हा चित्रपट संगीतप्रेमींसाठी आध्यात्मिक गीत-संगीताची अनोखी मेजवानी घेऊन आला आहे. या चित्रपटात दीपा परब, उदय टिकेकर, संदेश जाधव, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनीषा सबनीस आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. याखेरीज अभिनेता संतोष जुवेकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी, नेहा राजपाल या गायकांच्या आवाजात संगीतकार प्रवीण कुंवर यांनी गीतकार समृद्धी पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतसाज चढवला आहे. संकलन निलेश गावंड यांनी केले असून, डीओपी अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे.
