सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील अंतर फारच कमी झाले आहेत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या विविध अॅप्सच्या माध्यमातून सेलिब्रिटी त्यांचे दररोजचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तर कधीकधी ते चाहत्यांना प्रश्न विचारण्याचीही संधी देतात. अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिने नुकताच इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी तिला आवडत्या खाद्यपदार्थापासून ते आवडतं फिरण्याचं ठिकाण कोणतं असे अनेक प्रश्न विचारले.
एका चाहत्याने मीराला ती पुन्हा गरोदर आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर तिने “नाही” म्हणत हसण्याचा इमोजी पोस्ट केला. याचसोबत तिने बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचंही स्पष्ट केलं. फिल्म इंडस्ट्रीतही येण्याचा विचार आहे का असा प्रश्न दुसऱ्या चाहत्याने विचारला असता मीराने त्यालासुद्धा ‘नाही’ असंच उत्तर दिलं.
आणखी वाचा : ‘या’ व्यक्तीमुळे सलमान आजही आहे अविवाहीत?
मीरा जरी मोठ्या पडद्यावर दिसणार नसली तरी ती २०१८ मध्ये एका जाहिरातीत झळकली होती. ती सोशल मीडियावरही अनेक प्रॉडक्ट्सची जाहिरात करताना दिसते. शाहिद कपूरने २०१५ मध्ये मीराशी लग्नगाठ बांधली. या दोघांना चार वर्षांची मुलगी मिशा आणि दोन वर्षांचा मुलगा झैन आहे. शाहिद आणि मीरामध्ये १३ वर्षांचं अंतर आहे.