‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. सारा ही सध्या चर्चेतील स्टार किड्स पैकी एक आहे. ती तिच्या अभिनयासोबतच लव्ह अफेअरमुळे चर्चेत असते. नुकताच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका चाहत्याने साराच्या हाताला चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या इन्स्टाग्रामवर साराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती जिमहून बाहेर पडताना दिसत आहे. दरम्यान तेथे असणाऱ्या काही लोकांनी तिला फोटो काढण्याची विनंती केली. सारा तिच्या चाहत्यांच्या विनंतीचा नेहमी मान राखते. तिने त्यांच्यासोबत फोटो काढला. पण मध्येच एक चाहता येतो आणि सारासोबत हात मिळवतो. दरम्यान तो साराच्या हाताला चुंबन करण्याचा प्रयत्न करतो. ते पाहून सारा आश्चर्यचकित होते. लगेच साराचा अंगरक्षक तेथे येतो आणि त्याला लांब करतो.

सारा लवकरच अभिनेता वरुण धवनसोबत ‘कूली नंबर १’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेला अभिनेता गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता चित्रपट निर्मात्यांनी रिमेक करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट १ मे २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.