छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर शेअर करत असलेले फोटो कायमच चर्चेचा विषय ठरतो. आता एका चाहत्याने हिनाचे हॉट फोटो पाहून चक्क तुमच्याविरोधात केस करेन असे म्हटले आहे.
नुकताच हिनाने इन्स्टाग्रामच्या ‘AskMeAnything’ या फिचरच्या माध्यमातून चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. दरम्यान एका चाहत्याने हिनाबद्दल असे काही लिहिले आहे की ते वाचून स्वत: हिना हसू लागली आहे.
आणखी वाचा : “तुला अंतर्वस्त्र पाठवते” म्हणणाऱ्याला अनुषा दांडेकरचं सडेतोड उत्तर; म्हणाली…
एका चाहत्याने ‘मी तुमच्याविरोधात केस करेन की इतक्या गरमीमध्ये तुम्ही तुमच्या हॉट अंदाजाने आम्हाला मारुन टाकाले’ असे म्हटले होते. ते पाहून हिनाला देखील हसू अनावर झाले. तिने हसत हसत ‘करुन टाक’ असे म्हटले आहे.
हिना सोशल मीडियावर सतत तिचे फोटो शेअर करत असते. बऱ्याच वेळा ती बिकिनीमधील फोटो शेअर करताना दिसते. तिचे हे फोटो कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी हिनाने मालदिवमधील फोटो शेअर केले होते. ते फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हिनाने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत काम केले होते. तिच्या या मालिकेतील अक्षरा या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. त्यानंतर तिने काही दिवस ‘कसौटी जिंदगी २’ मध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली होती. तसेच ती ‘बिग बॉस १४’मध्ये देखील दिसली होती.