गेल्या काही दिवासांपासून अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर चर्चेत आहे. जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याचे म्हटले जात आहे. पण आता लॉकडाउनमध्ये शिबानी फरहान आणि त्याची मुलगी अकिरासोबत वेळ घालवताना दिसत आहे. दरम्यान फरहानने शिबानीचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फरहानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिबानी त्यांच्या पाळीव कुत्र्याला घाबरवताना दिसत आहे. बराच वेळा शिबानी त्याला घाबरवत असते पण तो मात्र तिला काही घाबरत नाही. नंतर अचानक तो शिबानीवर भुंकतो आणि ती घाबरते. घाबरल्यानंतर शिबानीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. असा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

शिबानीने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मी संपूर्ण दिवस टायसनला चावण्यापासून रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करीत आहे’ असे तिने कॅप्शन दिले होते. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक जण त्यावर कमेंट करत आहेत.

फरहानच्या या पाळीव कुत्र्याचे नाव टायसन आहे. फरान बराच वेळा त्याच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.

शिबानी आणि फरहान अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात, तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू आहे. फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्याने पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुले देखील आहे. घटस्फोट झाल्यानंतर फरहानचे नाव श्रद्धा कपूरशी जोडले गेले. मात्र शक्ती कपूर यांना हे नाते मान्य नसल्याने त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर फरहान शिबानीला डेट करू लागला.