‘फास’ चित्रपट प्रेक्षकभेटीला…

देश-विदेशातील अग्रगण्य सिनेमहोत्सवांमध्ये ‘फास’चं  कौतुक करण्यात आलं आहे. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आपण जे करू शकलो नाही ते मुलांना मिळवून द्यायचं आणि त्यांना खूप मोठं बनवायचं हे स्वप्न प्रत्येक आई-वडिलांच्या डोळ्यांत तरळत असलं तरी शेतकरी मात्र याला अपवाद आहे. आजही जिथे शेतकऱ्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे, आपल्या मुलांच्या मूलभूत गरजा भागवण्याची चिंता सतावते आहे, तिथे त्यांच्या डोळ्यांत मोठं बनण्याची स्वप्नं कुठून येणार?,  याच वास्तवतेची जाणीव करून देणारा ह्यफासह्ण हा मराठी चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, ग्रामीण भागाबरोबरच शहरी प्रेक्षकांचाही या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

या प्रोमोमध्ये दिसणारी गावची वस्ती, आत्महत्या करणारा जीव, मरण इतकं सोपं नसतं हे समजावून सांगणारा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, शेतकऱ्याच्या व्यथा, नैसर्गिक संकटं, शेतकऱ्यांची जगण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि अखेरीस अशीच परिस्थिती राहिली तर गावची स्मशानं होतील ही चेतावणी देणारा संवाद ह्यफासह्णच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. या चित्रपटाची निर्मिती माहेश्वरी पाटील चाकूरकर प्रस्तुत ह्यफासह्णची निर्मिती नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड यांनी मिळून केली आहे. अविनाश कोलते यांनी दिग्दर्शन केलं आहे.

देश-विदेशातील अग्रगण्य सिनेमहोत्सवांमध्ये ‘फास’चं  कौतुक करण्यात आलं आहे. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ह्यफासह्णची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी केलं असून, दिग्दर्शनाच्या जोडीला अविनाश कोलते यांनीच पटकथालेखनाचं कामही केलं आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता उपेंद्र लिमये या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. याखेरीज कमलेश सावंत शेतकऱ्याच्या, तर सयाजी शिंदे डॉक्टरच्या भूमिकेत आहेत. यांना पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, नीलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या कलाकारांची साथ लाभली आहे. डिओपी रमणी रंजन दास यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून, अपूर्वा मोतीवाले व आशीष म्हात्रे यांनी संकलन केलं आहे. कला दिग्दर्शन संतोष समुद्रे यांचं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fas movie audience dream in the eyes of every parent akp

Next Story
शाहीर पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी