चित्रपटप्रेमींना या आठवडयाचा शेवट तीन नवीन बॉलीवूड चित्रपट पाहून करता येणार आहे. आज (शुक्रवार) रांझना, एनिमी आणि शॉर्टकट रोमिओ हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
सोनम कपूर आणि तेलगू अभिनेता धनुष यांचा ‘रांझना’ हा चित्रपट एक प्रेमकथा आहे. या दोघांनीही मिळून चित्रपटाचे देशभर चांगलेच प्रमोशन केल्याने प्रेक्षकांनाही चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. चित्रपटाची कथा ही किशोरवयीन मुलगी आणि मुलावर आधारित असून बनारस शहरातील हिंदू मुलगा कुंदन हा एक मुस्लिम मुलगी झोयाच्या प्रेमात पडतो. सोनम व धनुष यांनी या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात अभय देओल आणि स्वरा भास्कर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘रांझना’ ही क्रिशीका लुल्लाची निर्मिती असून ए.आर.रेहमान याने संगीत दिग्दर्शन केले आहे.
मिथुन चक्रवर्ती यांची प्रमुख भूमिका असलेला ‘एनिमी’ हा चित्रपटही आज प्रदर्शित झाला आहे. एकीकडे रांझना ही प्रेमकथा तर ‘एनिमी’ हा गुप्तचर यंत्रणा आणि माफिया डॉन यांच्यावर आधारित चित्रपट अशी जुगलबंदी रंगणार आहे. चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय, सुनील शेट्टी, के.के.मेनन, जॉनी लिवर, महेश मांजरेकर आणि युविका चौधरी या कलाकारांनी गुप्तचर यंत्रणेतील अधिका-यांची भूमिका साकारली आहे. तर मिथुन चक्रवर्ती हे डॉनच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘एनिमी’चे दिग्दर्शन अशु त्रिखाने केले असून मिथुन यांच्या पत्नी योगिता बाली या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.
सुसी गणेशन याचा रोमांचक ‘ शॉर्टकट रोमिओ’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात नील नितीन मुकेश, ‘गो गोवा गॉन’ चित्रपटातील अभिनेत्री पुजा गुप्ता हे प्रेमीयुगुलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अमिषा पटेल हिने खलनायिकेची भूमिका साकारली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2013 रोजी प्रकाशित
बॉक्स ऑफिसवर रांझना, एनिमी आणि शॉर्टकट रोमिओ प्रदर्शित
चित्रपटप्रेमींना या आठवडयाचा शेवट तीन नवीन बॉलीवूड चित्रपट पाहून करता येणार आहे. आज (शुक्रवार) रांझना, एनिमी आणि शॉर्टकट रोमिओ हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-06-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Filmy friday raanjhanaa enemmy shortcut romeo release today