बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण चित्रपट प्रदर्शनापूर्वी दीपिकाने जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात लावलेल्या हजेरीमुळे चित्रपटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात होती. अशा परिस्थितीतही ‘छपाक’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर पाच कोटींची कमाई केली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘छपाक’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाच कोटींचा गल्ला जमावला आहे. तसेच आवड्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत या कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
#Chhapaak ‘s All-India Day 1 Early Estimates Nett is around ₹ 5 Crs..
Expected to grow over the weekend..
— Ramesh Bala (@rameshlaus) January 11, 2020
१० जानेवारीला ‘छपाक’ चित्रपटासोबतच अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. त्यामुळे छपाकला केवळ १७०० स्क्रीन भारतात आणि ४६० स्क्रीन विदेशात मिळाल्या. एकूण २१६० स्क्रीन मिळाल्या असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
आणखी वाचा : Fact check: खरंच ‘छपाक’मध्ये ‘नदीम खान’चे नाव बदलून ‘राजेश’ करण्यात आलं का?
मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याची मोठी संधी अभिनेता विक्रांत मेस्सीला मिळाली. आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसला आहे. चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यात आला आहे. अॅसिड हल्यानंतर करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे.