अभिनेता सैफ अली खान गेल्या काही वर्षांपासून आपल्याला विनोदापलीकडे जाऊन अॅक्शन भूमिका साकारताना दिसतोय. मात्र, त्याच्या आगामी चित्रपटात तो हटके भूमिका साकारताना दिसेल. आगामी ‘शेफ’ या चित्रपटात तो शेफची (आचारी) भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा पहिलाच पोस्टर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, सैफ यात आपल्या रील लाइफ मुलासोबत दिसतो. हॉलिवूडच्या ‘शेफ’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : हृतिकला माझी माफी मागावीच लागेल- कंगना रणौत

व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘शेफ’चा पहिला पोस्टर ट्विट केलाय. पोस्टरसह त्यांनी लिहिलंय की, ‘शेफचा फर्स्ट लूक. सैफची प्रमुख भूमिका आणि ‘एअरलिफ्ट’ फेम राजा कृष्णा मेननचे दिग्दर्शन. चित्रपट ६ ऑक्टोबर २०१७ला प्रदर्शित होईल.’ आज दुपारी २ वाजता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/903112732890718209

याआधी आलेल्या फोटोंमध्ये सैफ ढाब्यावरील स्वयंपाकगृहात दिसला होता. यावेळेसही तो एका स्वयंपाकगृहात दिसत असला तरी त्याला आता एका साथीदाराची जोड मिळाल्याचे दिसते. या चित्रटासाठी उत्सुक असलेला सैफ म्हणालेला की, ‘शेफसाठी चित्रीकरण करताना मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. भारतीय प्रेक्षकांना लक्षात घेऊन राजाने छान प्रकारे कथेची मांडणी केली असून, वडील-मुलाचे नातेही यात अधोरेखित करण्यात आलेय.’

वाचा : माहेरचा गणपती ‘माझा जन्म अनंत चतुर्दशीचा’

राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित ‘शेफ’ चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि ‘बांद्रा वेस्ट पिक्चर्स’ यांनी केलीये. २०१४ साली प्रदर्शित झालेला ‘शेफ’ हा मूळ हॉलिवूड चित्रपट एका व्यावसायिक शेफवर आधारित होता. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तो नामांकित रेस्तराँमधील नोकरी सोडतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेले अनुभव आणि स्वतःचे हॉटेल सुरु करताना होणारा आनंद यात चित्रीत करण्यात आलेला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look poster of saif ali khan starrer chef is out